गांधीविषयी अनुद्गार काढल्याबद्दल आपला राग समजू शकतो. त्याचे खंडन जरूर करावे. गांधींचे इतर क्षेत्रातील थोरपणाचा आणि भ्याडपणा म्हणण्याच्या घटनेची गल्लत करू नये. गांधीजींच्या थोरपणाच्या अनेक गोष्टींविषयी माझ्या मनात नितांत आदर आहे. (तो कधीतरी वेगळा विषय!) मात्र ह्याबाबतीत गांधीशी पूर्ण मतभेदही आहेत. वेदवाक्यप्रमाणम् हे ही न मानणारी मानसिकता बाळगून बसल्यावर केवळ गांधींचे आहे म्हणून निषेध नोंदवायचा नाही हे कसे चालेल?
आणि आपला विरोध फक्त भाषेला आहे. साक्षींनी मांडलेली भावना आपण कोणत्या तीव्र भाषेत मांडणार ते जरूर कळवावे. तसेच "भ्याडपणाच्या" शेऱ्याचाही योग्य वाटल्यास जळजळीतपणे सांसदीय भाषेत निषेध करावात ही विन्ण्ती.
दुसरे - येथील वाचकवर्गाविषयी, विचार मांडणाऱ्यांविषयीच्या आपल्या मतांचा पुन्हा एकवार विचार करावात.
विचक्षण - आपण सुजाण आहात... संवाद अनर्थाशिवाय आपल्यापर्यंत पोहचेल ही आशा!