आपणास कळवण्यास अतिशय आनंद होत आहे की लोकांनी लोकांसाठी लिहिलेला मुक्त मराठी माहितीकोश विकिपीडिआने १००० लेखांची महत्त्वपूर्ण पायरी पार केली आहे. इतकेच नव्हे तर भारतीय भाषांमधील सर्वात जास्त लेख मराठी विकिपीडिआमध्ये आहेत.

विकिपीडिआ मुक्त माहितीच्या हस्तांतरणासाठी बनलेली एक स्वयंसेवी संस्था आहे जी विविध भाषांमध्ये (१०० पेक्षा अधिक)  मुक्त(लोक विनामूल्य वापरू शकतील असा) माहितीकोश तयार करत आहे.  या प्रकल्पात तुम्हीही मदत करू शकता. नवीन माहितीपूर्ण लेख लिहिणे, भाषांतर करणे, दुरुस्त्या करणे इत्यादी गोष्टींसाठी खूप लोकांची गरज विकिपीडिआला आहे.

भारतीय भाषांमध्ये (लेखांची संख्या)/(भाषा  बोलणाऱ्यांची संख्या) हे प्रमाण फारच कमी आहे यासाठी विकिपीडिआने काही विद्यापीठांमधील भाषा विभागांमध्ये काम करणाऱ्या विद्यार्थी तसेच प्राध्यापकांना आर्थिक साहाय्य देऊन त्यांच्याकडून लेख लिहून घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल अधिक माहिती येथे मिळेल.

मनोगतवासींना संगणकावर मराठी वापरण्याचा अनुभव असल्याने येथील बरेच लोक विकिपीडिआला मदत करू शकतील.

प्रतीक