मुद्दे नेहेमीचेच. आपल्या सोयीचा अर्थ काढून (जे आपल्याला खोडता येऊ शकतील असेच) त्यावर प्रतिक्रिया लिहिणे हा नेहमीचाच प्रकार आहे. नेहरूंच्या बाबत अशाच प्रकारचा प्रतिसाद आला होता त्यामुळे इथेही तीच अपेक्षा होती.
सत्य हे कटु असले तरी ते सत्य असते. ते डोळसपणे व खुल्या दिलाने स्विकारले पाहिजे. माझे विधान हे बेजबाबदार नसून पूर्ण सत्य व संयत आहे. आपल्या गांधीप्रेमामुळे त्या विधानावर आपण संतप्त झाला असाल तर माझा नाइलाज आहे. आपले आदर्श व त्यांच्याविषयीच्या आपल्या भावना मी समजू शकतो
१. मी गांधीप्रेमी आहे असे मी कुठेही म्हटले नाही. इतर कुणी म्हटले तरी मी मान्य करणार नाही, कारण मी तसा मुळीच नाही. ते माझे आदर्श असण्याचेही कारण नाही. फक्त माझे वैचारीक मतभेद असलेल्या परंतु काही चांगले कार्य केलेल्या व्यक्तिबद्दल मी अशा बेफिकीरीने विधाने करणार नाही.
सत्याबद्दल म्हणाल तर कदाचित त्याबाबत तुम्हालाच जास्त डोळस असण्याची गरज आहे.
२. गांधी १००% चांगले होते असे मी कुठेही म्हटले नाही. किंबहुना माझ्या प्रतिसादातच मी चुकांची शक्यता गृहित धरलेली आहे. त्यामुळे गांधींच्या ढीगभर चुका मला दाखवण्याने काहीही साधत नाही. त्यातील बहुतेक मी ऐकलेले आहेत व काही मान्य आहेत.
ज्याला असामान्य शौर्याचे प्रतिक मानले गेले त्या मदनलाल धिंग्रांचा निषेध करणाऱ्या गांधींना आम्ही काय किंमत द्यावी?
३. धिंग्रांचा निषेध केल्यामुळे गांधींची किंमत तुमच्या लेखी शून्य होत असेल तर गांधींबद्दल अनुदार उद्गार काढले म्हणून सावरकरांची, व सावरकरांबद्दल अनुदार उद्गार काढले म्हणून इतर कोणा मोठ्या नेत्याची किंमत शून्य होते का? त्या त्या व्यक्तींनी केलेले कार्य एका चुकीने क्षणात शून्य होते का? अशी तुमची मूल्यमापनाची पद्धत असेल तर मग तुमच्याशी फारसा अर्थपूर्ण संवाद होऊ शकत नाही असे वाटते.
आणखी एक प्रश्न. असामान्य शौर्याचे प्रतीक धिंग्रांचा निषेध केला म्हणून गांधींची किंमत शून्य होते असे म्हणता आहात तर मग, स्वातंत्र्यलढ्याचे शिल्पकार मानल्या गेलेल्या (तुम्ही आम्ही मानतो का हा वेगळा मुद्दा)गांधींबाबत अशी विधाने करणाऱ्या तुमची किंमत काय करायची? निदान गांधींनी असे मूल्यमापन (चुकीचे का होईना) करण्यासाठी काही स्वतःचा असा काही एक मार्ग/कार्य केले आहे. तुम्ही गांधींचे मूल्यमापन करताना तुम्हाला काय locus standi आहे?
पोपटपंची हा शब्द मी आवर्जून वापरला कारण पोपटाप्रमाणे प्रत्येक तेजोक्षोभाच्या प्रसंगी ते तेच ते निषेधाचे सूर आळवायचे.
चुकून का जाणीवपूर्वक तो तुमचा प्रश्न आहे. तो शब्द गांधींबाबत वापरणे बेजबाबदारपणाचे आहे हे ही मी जाणीवपूर्वकच लिहिले आहे.
-विचक्षण