तरुणरसिक महोदय,
'याल तर बरोबर नाहीतर एकटा' असे ज्या माणसाचे वागणे होते त्याचे लेख येथे टाकताना कोणी वाचले, कोणी प्रतिसाद दिले, कोण उपक्रमात सहभागी झाले, याचा हिशेब का? तुम्ही एकदा जाहीर विनंती केली आहे. लोक ती वाचतील. नवे येणारे ही वाचतील. कोणी सहभागी झाले नाही, तरी तुम्ही लिहीत राहा. कारण त्यांचे विचार इतरांना कळावेत अशी तुम्हाला तळमळ आहे. तुम्ही नाराज का ते कळतंच नाहीये !

असो. लहान तोंडी मोठा घास घेतला म्हणून क्षमा करा. अत्त्यानंदांचा प्रतिसाद मननीय आहे असे वाटते. कीर्तनाला कोणी आले नाही तरी, समोर राम आणि बुवा तल्लीन होऊन कीर्तन करत आहेत, असे प्रसंग घडलेले आहेत. ते नक्कीच स्फूर्तिदायक आहेत.

लेखनास शुभेच्छा,
आपला,
--लिखाळ.