विचक्षणराव,
'मनोगत' वर वरचेवर तीव्र मतभेद, भांडणे होतच असतात. त्यातून डोक्यात राख घालून 'आता मनोगत वर येणे नको' असा त्रागा करण्याचे कारण नाही. तुम्ही काय, मी काय... इथे असलो काय आणि नसलो काय, 'मनोगत' ला  काही फरक पडत नाही. शिवाय 'मनोगत' वरील मतभेद तात्कालिन आणि एकेका मुद्द्याशी निगडीत असतात असा माझा अनुभव आहे.'मनोगतावरील लोक फारसे सुजाण नाहीत' असा निष्कर्षही घाईघाईने काढू नका. अहो ते तसे आहेत (सुजाण)  म्हणून तर इतक्या मारामाऱ्या होऊन मी अजून इथे टिकून आहे. तसे तुम्हीही रहावे, ही इच्छा.