अधिक संशोधनाअंती सावरकरांचा मृत्यू माझ्या जन्माच्या काही दिवस नंतर झाल्याचे आढळते. परंतु तरीही बहुधा त्यांना मला दत्तक घेण्यात किंवा मला ग्रासण्यात विशेष रस नसावा, असे वाटते. कारण त्यांनी तसा कोणताच प्रयत्न केल्याचे आठवणीत नाही.आधी कोठेतरी म्हटल्याप्रमाणे या सर्व व्यक्तींचा मृत्यू माझ्या जन्माच्या कित्येक वर्षे आधी झाल्याने, (या सर्व व्यक्तींच्या) दुर्दैवाने त्यांच्यापैकी कोणीच मला दत्तक घेऊ शकले नाही ("Success has many fathers; Failure is an orphan..."), पण त्यामुळेच या सर्व व्यक्तींना मला ग्रासण्याची संधीही उपलब्ध होऊ शकली नाही. तेव्हा कृपया मला गांधीग्रस्त, नेहरूग्रस्त, टिळकग्रस्त, आंबेडकरग्रस्त, बोसग्रस्त किंवा सावरकरग्रस्त अशी लेबले लावू नये.
लेबलाबाबत सोयीनुसार ठरवावे.