वरील सर्व मारामारीवरून एवढेच लक्षात येते की गांधी ('महात्मा' किंवा 'जी' मुद्दामच लावलेला नाही) काय, नेहरू काय, जीना काय, सावरकर काय किंवा आंबेडकर काय, या सर्व सार्वजनिक व्यक्ती असल्यामुळे कोणीही उठावे आणि आपापल्या सोयीप्रमाणे / समजुतीप्रमाणे (beliefs अशा अर्थी) त्यांच्याबाबत काहीही विधाने करावीत, ते बहुधा क्षम्य आहे.


अगदी माझ्या मनातले बोललात.

कायद्याबद्दल मला कळत नाही, पण मानहानीच्या संदर्भात खाजगी व्यक्ती आणि सार्वजनिक व्यक्ती यांना कायदा onus of proof च्या दृष्टिकोनातून वेगळा लावला जातो, असे ऐकिवात आहे. (तज्ज्ञांनी खुलासा करावा.) त्यामुळे कोणीही उठावे आणि निर्धास्तपणे काहीही लिहावे.

बरोब्बर. आणखी एक जाणून घ्यायचे आहे. मला हे जाणून घ्यायचे आहे.

उदाहरणार्थ: एखाद्या प्रसिद्ध, सार्वजनिक व्यक्तीबद्दल उद्या जाहीररीत्या लिहिले 'टग्या हा टग्या म्हणून मोठा असला माणूस तसा वाईटच, कॅरेक्टर खराबच, असे मी ऐकले आहे. त्याच्या जवळच्या लोकांनी मला तसा सांगितले आहे." (हे केवळ उदाहरण आहे आणि टग्याबद्दल मला केवळ आदर आहे, हे वेगळे खरेतर सांगायला नकोच)

अशावेळी मानहानीचा कायदा काय म्हणतो? तो माणूस (इथे गांधी घेऊ या) अशावेळी कुठली कारवाई करू शकतो? किंवा त्याचे (गांधीजींचे) वारसदार कुठले कायदेशीर पाऊल उचलू शकतात?

चित्तरंजन