"आकलेचं कांदं" नांवाचं एक अशिक्षित पात्र जत्रेला जातं, तिथं त्याचा फजितवडा होतो आणि तो साधाभोळा माणूस "राम राम घ्यावा" असं कुजबुजत आपल्या गांवाकडे परत जातो. या साध्या गोष्टीत दडलेला आशय हुषार मनोगतींनी "ता वरून ताकभात" असा ताडला आणि मला मौल्यवान सूचना केल्या. याबद्दल मी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानीत आहे.
एक बारिक मुद्दा. मनोगताचा सदस्य होण्यापूर्वीपासून मी कामाच्या पाट्या वाहतोच आहे, तेंव्हा त्याचं निमित्त सांगून कांही मी इतकं चांगलं संकेतस्थळ सोडून जाणार नाही.