इट सीम्ज़ वी ओल हॅव ए राइट टू ट्रड्यूस विथ इम्प्युनिटी.

खरं आहे (असं वाटतं), पण जोपर्यंत आपण ज्या व्यक्तीविरुद्ध अशी विधानं करतो, ती व्यक्ती सार्वजनिक आहे तोपर्यंत!

खाजगी व्यक्तीविरुद्ध अशी विधानं केल्यास ती खरी आहेत हे सिद्ध करण्याची जबाबदारी विधानकर्त्याकडे राहते, आणि विधानकर्ता ती सिद्ध न करू शकल्यास त्याविरुद्ध कायदेशीर कारवाई होऊ शकते, असा माझा अंदाज आहे.

- टग्या.

अवांतर: 'सार्वजनिक व्यक्ती' कोणाला म्हणावं? एखादा राजकारणी ही निश्चितपणे एक सार्वजनिक व्यक्ती आहे. लेखक, नट वगैरेसुद्धा कदाचित होऊ शकतील. एखादा शास्त्रज्ञ 'सार्वजनिक व्यक्तीं'मध्ये मोडू शकेल काय? एखादी व्यक्ती सार्वजनिक आहे की खाजगी, हे ठरवण्याचा निकष काय?

परंतु हा कदाचित वेगळ्या चर्चेचा विषय होऊ शकेल.