सर्वसाक्षींच्या वरील प्रतिसादात मांडलेल्या सर्व मतांशी मी सहमत आहे.

वाजपेयी आणि सावरकर यांनी ब्रिटीश सरकारला लिहून दिलेल्या माफीपत्राबद्दल आजही लोक संसदेत गोंधळ घालतात.

पण देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या हुतात्म्यांची अवहेलना करणारे कसे समर्थनीय ठरवले जातात? हा पांढरा फॅसिझम म्हणावा का? का ह्याला गांधीजींनी केलेले ब्रिटीशांचे लांगूलचालन म्हणावे?

दुसरे असे की भगतसिंगाला हत्येसाठी सजा मिळालीच पाहिजे असा आग्रह धरणाऱ्या गांधींनी ज्या स्कॉटने शस्त्रहीन व शांततामय आंदोलन करणाऱ्या लालाजींचा बेदम मारहाणीने निर्घृण खून केला त्या स्कॉटला जाब का विचारला नाही? त्याला फाशी व्हावे म्हणून ते उपोषणाला का बरे बसले नाहीत?

निषेध करणाऱ्यांनी याचे उत्तर द्यावे.

गांधीजींबद्दल आदर मलाही आहे. त्यांच्याबद्दल असभ्य भाषा वापरलेली मलाही आवडत नाही. पण म्हणून मी त्यांच्याबद्दल संताप व्यक्त करु नये असे होत नाही. (सर्वसाक्षींनी केलेले विधान मला असभ्य वाटत नाही. उलट ते जास्त संयत आहे असे वाटते.)