इट सीम्ज़ वी ओल हॅव ए राइट टू ट्रड्यूस विथ इम्प्युनिटी.
खरं आहे (असं वाटतं), पण जोपर्यंत आपण ज्या व्यक्तीविरुद्ध अशी विधानं करतो, ती व्यक्ती सार्वजनिक आहे तोपर्यंत!
माझे वरील विधान सार्वजनिक व्यक्तींबद्दलच होते.
खाजगी व्यक्तीविरुद्ध अशी विधानं केल्यास ती खरी आहेत हे सिद्ध करण्याची जबाबदारी विधानकर्त्याकडे राहते, आणि विधानकर्ता ती सिद्ध न करू शकल्यास त्याविरुद्ध कायदेशीर कारवाई होऊ शकते, असा माझा अंदाज आहे.
खरं आहे (असं वाटतं), पण जोपर्यंत आपण ज्या व्यक्तीविरुद्ध अशी विधानं करतो, ती व्यक्ती सार्वजनिक आहे तोपर्यंत!खाजगी व्यक्तीविरुद्ध अशी विधानं केल्यास ती खरी आहेत हे सिद्ध करण्याची जबाबदारी विधानकर्त्याकडे राहते,अवांतर: 'सार्वजनिक व्यक्ती' कोणाला म्हणावं? एखादा राजकारणी ही निश्चितपणे एक सार्वजनिक व्यक्ती आहे. लेखक, नट वगैरेसुद्धा कदाचित होऊ शकतील. एखादा शास्त्रज्ञ 'सार्वजनिक व्यक्तीं'मध्ये मोडू शकेल काय? एखादी व्यक्ती सार्वजनिक आहे की खाजगी, हे ठरवण्याचा निकष काय?
मला वाटतं एखाद्याला व्यक्तीला आपण किती ओळखतो यावरून त्याचे सार्वजनिकपण ठरत असावे. मग तो कुठल्याही पेशाचा का असेना. एखाद्याला(७०) प्रतिसाद आले तर अधिक सार्वजनिक. दुसऱ्याला ५ च प्रतिसाद आले तर तो कमी सार्वजनिक. असे करता येईल काय?