लेख आवडला. लहानपणी एका वाढदिवसाला स्वा. सावरकरांचे एक छोटेखानी चरित्र भेट मिळाले होते. त्यातली मदनलालची गोष्ट आठवली.
तरी मला भारतीय (किंवा कुठल्याच) क्रांतीकारकांचा तर्क समजावून घेताना थोडे अवघड जाते. कोणती भूमी कोणाची हे कसे ठरवायचे?
रस्त्यावरून दिमाखाने जाणाऱ्या जर्मनांना एखाद्या इंग्रजाने ठार केले तर त्याचा देशभक्त म्हणून गौरव केला जाईल
नागालँडमधल्या रस्त्यावरून जाणाऱ्या शीख सैनिकाला एखाद्या नागा नागरिकाने ठार केले किंवा काश्मीरमधील रस्त्यावरून जाणाऱ्या मराठा रेजिमेंटच्या जीपवर काश्मीरींनी बॉम्ब फेकले तर काय म्हणायचे?
मला माझ्या देशाचा आणि त्याच्या विविधतेने नटलेल्या परंपरांचा अभिमान आहे. (खरोखर आहे.) पण माझ्या 'देशबांधवांना' तो तसाच असावा असे मी कसे म्हणू?