प्रतिसाद आवडला.
प्रसिद्धी कधी फुकट येत नाही असे ऐकले होते. खरे खोटे प्रसिद्ध व्यक्तीच जाणोत.
खाजगी आयुष्याबद्दल जाहीर मानहानी केल्यास तो गुन्हा असावा. जे जाहीर आहे त्याबद्दल निषेध नोंदवता येणे लोकशाहीत आवश्यक आहे असा माझा समज आहे. (तज्ञांनी जमल्यास याबद्दलही खुलासा करावा.)
माझ्यावर अजून तरी कोणी जाहीर टीका केलेली नाही. ते भाग्य बहुदा सार्वजनिक व्यक्तींनाच लाभते असे दिसते.
अवांतरः
कायद्याचे ज्ञान नसतानाही लोक बरोबर कसे वागू शकतात हा मला पडलेला एक खुळचट प्रश्न आहे.
डिस्क्लेमरः मलाही कायद्याचे फारसे ज्ञान नाही.