लेख आवडला परंतु एक नविनच कीडा डोक्यात वळवळला. मदनलाल धिंग्रा (की ढिंग्रा?) ह्यांचे शौर्य वखाणण्याजोगे असले तरी इंग्रज न्यायालयात केलेला त्यांचा हा युक्तिवाद फारसा पटला नाही.
जर उद्या हा देश जर्मनांनी जिंकला व रस्त्यावरून दिमाखाने जाणाऱ्या जर्मनांना एखाद्या इंग्रजाने ठार केले तर त्याचा देशभक्त म्हणून गौरव केला जाईल.
हो नक्कीच गौरव केला जाईल, परंतु इंग्रजांच्या देशात. हाच खटला जर्मनीमध्ये भरला तर त्यांच्या दृष्टीने ती 'एका जर्मन नागरिकाची हत्या' असल्याने हे कृत्य 'गुन्हा' म्हणूनच ठरवले जाईल. राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रद्रोह हे ज्या त्या देशाच्या संदर्भात उलटे सुलटे ठरू शकतात. जसे भारत पाकिस्तान युद्धामध्ये भारतीय सैनिकाने पाकिस्तानी सैनिकास कंठस्नान घातल्यास, भारताच्या दृष्टीने हे देशप्रेमी कृत्य ठरेल पण तेच पाकिस्तान च्या संदर्भात उलटे ठरते. तेंव्हा वरील मुद्द्याच्या आधारे इंग्रजांच्या न्यायालयात दाद न मिळाल्यास त्याबद्दल इंग्रज न्यायालयांना अन्याय्य ठरवता येत नाही.
अर्थात ही एक प्रामाणिक शंका आहे. "धिंग्रांच्या युक्तिवादात चूक शोधता ? आपली लायकी काय?" असे प्रतिसाद आल्यास बोलणे खुंटले.
बाकी 'पोपटपंची' बाबत वैद्यबुवांशी सहमत.