नुकताच शास्त्रीबुवांचे कौतुक करायचे का नाही ह्यावर चाललेला वाद वाचला.. त्यांवरून,

 आपल्या चुकीमुळे ग्राहकाला झालेला भुर्दंड परत केला... वस्तूची योग्य किंमत असणारी नाणी उचलली असल्या गोष्टींमध्ये कौतुकास्पद ते काय आहे ?असा विचार मनात आला.

ह्याच यादीमध्ये, अमक्या अमक्याला एखाद्या जागेचा पत्ता विचारला असता त्याने बरोबर सांगितला.. मागवल्या पेक्षा वेगळाच पदार्थ ताटात पडल्याचे निदर्शनास आणल्यास खानावळ वाल्याने योग्य तो पदार्थ आणून दिला...असल्या गोष्टीही घालाव्यात का?