वा अनुताई!
अप्रतिम अर्थपूर्ण खारोळ्या! फारच छान...
सगळ्याच छान आहेत पण 'अनु'क्रमांक १, २, ३, ४, ६, ८ ह्या खारोळ्या विशेष आवडल्या.
विडंबन आणि विनोद तर आहेच पण मनाला स्पर्शून जाण्याचे सामर्थ्यही आपल्या खारोळीत आहे! आता हीच बघा ना -
तू समोर असलास कि
नुसतंच तुला जेवू घालणं होतं,
आणि तू जवळ नसताना
कसंबसं घास गिळणं होतं..
वा! अतिसुंदर!!
खारोळ्यांचा इतका सुंदर आहार मिळाल्याने आम्ही सुखाची ढेकर देत आहोत.
आपला
(भोजनतृप्त) प्रवासी