त्या पोपटपंचीवर आक्षेप असणाऱ्या सर्वांनाच लेख आवडला आहे. ह्या वादामुळे
अनेक नव्या गोष्टींचा बोध झाला. अर्थात ज्यांना आपले ऱ्हेटरिक सोडायचे
नाही ते कधीच सोडणार नाहीत. इंच इंच लढवू.
पण काही लोक गांधीना
हाणण्याची कुठलीही संधी सोडत नाहीत. हे दुर्दैव. गांधीनी चुका केल्या
असतील त्यांनी राजकारण केले असेल. पण राजकारण कुणी केले नाही. चुका कुणी
केल्या नाहीत. सावरकरांनी राजकारण केले नाही काय. हिंदू महासभेने मुस्लिम लीगशी युती केली
नव्हती काय? आणि तिचे सावरकरांनी समर्थन केले नव्हते काय? सावरकरांनी
इंग्रजांना आणि नंतर १९५० साली भारत सरकारला माफीपत्र लिहून दिले म्हणून
आपण त्यांना ऍपलजिस्टिक (ह्या शब्दाला खरे तर काही डावे यूफ़ेमिज़म/Euphemism म्हणतील) म्हणणे
आणि त्यांचे योगदान नाकारणे योग्य ठरणार नाही.
गांधींवर नको ती टीका करणारे, भगतसिंगांचे दाखले देणारे, भगतसिंगांना अखेर हळुहळू हिंसाचाराचा (इंडिविज्युअल टेररिज़म) मार्ग योग्य नाही हे पटले होते हे हे सोयीस्करपणे विसरतात. (ते हे देखील सोयीस्करपणे विसरतात की भगतसिंगाची वैचारिक भूमिका डावी होती. कम्युनिस्ट नाही बरे का.) फाशीच्या
शिक्षेची घोषणा झाल्यावर त्यांच्या एका मित्राने 'मी आता हिंसाचाराचा
मार्ग त्यागला आहे असे आपल्या तरूण सहकाऱ्यांना का सांगितले नाहीस?" असे
म्हटल्यावर, "मी असे केले असते तर मी अप्रत्यक्षपणे दयेची याचना करतो आहे
असे दुनियेला वाटले असते," असे भगतसिंगांनी शेरासारखे उत्तर दिले.
चित्तरंजन