माझ्या मित्राना आलेल्या जपानी अनुभवात फारच कौतुकास्पद असे काही आहे असे मलाही वाटत नाही पण 'निरस्तपादपे देशे एरंडो ऽपि द्रुमायते।' असे म्हणतात त्यामुळे मला भारतातील रिक्षावाले आणि वाहनचालक यांच्या येणाऱ्या अनुभवांशी तुलना केल्यावर हे उल्लेखनीय वाटले. पुण्यात आम्हाला रिक्षाशिवाय गत्यंतरच नसते पण जवळच्या अंतरावर रिक्षावाले यायलाच तयार नसतात. तीच गोष्ट मुंबईतील टॅक्सी आणि रिक्षावाल्यांची ! शिवाजीनगर एस्. टी. स्टँडवर उतरून सिंहगड रोड म्हटले की मीटरपेक्षा दहा रुपये जास्त पडतील अशीच सुरवात करतात.वाहनचालकांचे तर बोलायलाच नको.मी एकदा रस्त्याच्या उजव्या बाजूने अगदी कडेने जात असता मोटरसायकलवाला मागून येऊन मला अगदी चाटून गेला आणि वर मलाच "कसा चालतोय "असा दम देउन गेला.वस्तूच्या दर्जाबद्दल काय सांगायचे?मी केल्विनेटर रेफ़्रिजरेटर आणला आणि तिसऱ्याच दिवशी सगळा गॅस गळून गेला मग परत दुकानात नेऊन भरून आणावा लागला.माझ्या मुलाच्या बजाज मोटरसायकलचे
सिलिंडर वर्षभरातच बदलावे लागले.असे अनेकांचे अनेक अनुभव एकत्र केले तर एक ग्रंथच होईल.इत्यलम् ।