चित्त,

चुका आणि अपराध यांत फरक आहे. एखाद्या देशभक्ताला व त्याच्या धेयबद्ध कृत्याला भ्याडपणा म्हणणे व केवळ आपल्या विचारप्रणालीशी मिळता जुळता नाही म्हणून त्याचा धिक्कार करणे ही चुक नसून अपराध आहे. मी काय तो योग्य, मी काय तो अधिकारी, मी करतो तेच बरोबर बाकी सगळे चूक हा केवळ अहंकार आहे. ज्या क्रांतिकारकांनी एक महान नेता म्हणून सतत गांधींना मान दिला त्यांच्या स्पर्धेची (जी कधिच अस्तित्वात नव्हती) भिती बाळगून गांधींनी त्यांची जास्तीत जास्त मानहानी केली हे सत्य आहे आणि गांधी मोठे म्हणून त्यांनी काहीही केलेले समर्थनिय ही केवळ व्यक्तिपूजा व आंधळे प्रेम आहे.

<फाशीच्या शिक्षेची घोषणा झाल्यावर त्यांच्या एका मित्राने 'मी आता हिंसाचाराचा मार्ग त्यागला आहे असे आपल्या तरूण सहकाऱ्यांना का सांगितले नाहीस?" असे म्हटल्यावर, "मी  असे केले असते तर मी अप्रत्यक्षपणे दयेची याचना करतो आहे असे दुनियेला वाटले असते," असे भगतसिंगांनी शेरासारखे उत्तर दिले. >

हे लेखकाचे अनुमान असावे. भगतसिंगांना आपण चुकिच्या मार्गाने गेलोय असे कदापि वाटले नाही आणि त्यांनी कधीही पश्चात्तापही केला नाही. ते तुरुंगात असताना नेहेरुंनी त्यांना निरोप धाडला होता की जर तुम्ही आपल्याला हिंसेबद्दल व केलेल्या कृत्याबद्दल पश्चात्ताप होत असल्याचे मान्य कराल तर आम्ही तुमची फाशी रद्द होण्यासाठी प्रयत्न करू. एका राष्ट्रीय नेत्याचा अवमान करण्याची इच्छा नसल्याने भगतसिंगांनी 'सांगतो नंतर' असे मोघम उत्तर निरोपाला म्हणून दिले. मात्र त्याच दिवशी त्यांनी सरकारकडे 'मृत्युअर्ज' (डेथ पिटिशन) दाखल केला. त्या अर्जात त्यांनी असे निवेदन केले होते की माझ्याविरुद्ध राजद्रोहाचा आरोप आहे, मी सरकारविरूद्ध् युद्ध पुकारले आहे तेव्हा मला चोर-दरोडेखोरांप्रमाणे फाशी न देता बंदूकधारी शिपाई पाठवून एका योद्ध्याप्रमाणे गोळ्या घालून ठार करा.

संसदेत जेव्हा भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी बाँब्स्फोट केला तेव्हा केवळ संसद हादरवून सोडणे, त्यासाठी अटक होणे व उभ्या राहणाऱ्या अभियोगात इंग्रज राजवटीच्या जुलुमाची लक्तरे टांगून अन्याय व जुलुमाविरुद्ध साऱ्या जगाला सत्य दृष्टीस आणून देणे हा हेतू होता. तो बाँब व स्फोट दोन्ही अशा प्रकारचे होते की ज्यामुळे जिवीतहानी होणार नाही. स्फोटानंतर त्यांनी पळून जाण्याचा वा प्रतिकाराचा प्रयत्नही केला नाही. मात्र या अत्यंत धाडसी व संपूर्ण अहिंसक कृत्याचे ज्यात बाँब सारख्या अत्यंत हिंसक अस्त्राचा अत्यंत अहिंसक असा प्रतिकात्मक वापर केला होता, त्याबद्दल ना  गांधींनी त्यांच्यावर स्तुतिसुमने उधळली ना जनतेला त्यांची थोरवी सांगीतली. याचा कोणता खुलासा आपण द्याल?