वेदश्री आणि जयंतराव ह्यांच्या बहुमोल सूचनांचा समावेश करून सुधारलेली आवृत्ती.

जिंदगीभर न पावसाची, मी विसरेन ती रात

जिंदगीभर न पावसाची, मी विसरेन ती रात । अनोळखीशा सुंदरीच्या प्रथम भेटीची रात ॥ धृ ॥

हाय ते रेशमी केसांतून बरसते पाणी । फुलशा गाली विहरण्याला उत्सुक ते पाणी ॥
अंतरी वादळे जागवत्या घटनांची ती रात । जिंदगीभर न पावसाची, मी विसरेन ती रात ॥ १ ॥

भिऊन विजेला, अचानक ते बिलगणे तीचे । आणि लाजेने चूर होऊन लोपणे तीचे ॥
कधी न देखिली, न ऐकलीशी जादूभरी रात । जिंदगीभर न पावसाची, मी विसरेन ती रात ॥ २ ॥

लाल पदराला, आवरून पिळले जे तिने । हृदयी जळता जणू एक तीर सोडलेला तिने ॥
आग पाण्यात लावणार्‍या भावनांची ती रात । जिंदगीभर न पावसाची, मी विसरेन ती रात  ॥ ३ ॥

वसते गीतात जी, माझ्या ती, तस्वीरशी ती । तरुणपणीच्या धुंद स्वप्नांतली सुंदरी ही ती ॥
आसमानातून उतरलेल्या हितगूजाची ती रात । जिंदगीभर न पावसाची, मी विसरेन ती रात ॥ ४ ॥

लता:

जिंदगीभर न पावसाची, मी विसरेन ती रात । अनोळखीशा प्रवाशाच्या प्रथम भेटीची रात ॥ धृ ॥

हाय ज्या रात्री ह्या हृदयाने धडकणे शिकले  । अंतरी भावनाबहराने भडकणे शिकले ॥
माझ्या दैवातच उमटलेल्या भाग्यरेखेची रात । जिंदगीभर न पावसाची, मी विसरेन ती रात ॥ १ ॥

जेव्हा हृदयाने सप्तरंगी प्रेम आलापिले । नयन नयनांशी प्रेमगूज आळवू गेले ॥
त्याच गीतांची, विचारांत बुडालेलीशी रात । जिंदगीभर न पावसाची, मी विसरेन ती रात ॥ २ ॥

रफी:

रुसून गोष्टींनी, माझ्या, तू नको होऊ निराश । नाही नाही त्या विचारांनी नको होऊ निराश ॥
कधी न संपेल आपल्या ह्या संगतीची ही रात । जिंदगीभर न पावसाची, मी विसरेन ती रात ॥ ३ ॥

मराठी अनुवाद: नरेंद्र गोळे २००६०८१८