काल मी एका सार्वजनिक सभांरभासाठी गेलो होतो. नेहमीप्रमाणे उपस्थित समुदाया मधे हिन्दी आणि मराठी भाषिक होते. वक्त्याने मराठी बोलताच गलका झाला आणि वक्त्त्याला बिचा-याला तोडक्यामोडक्या हिन्दी मधे आपला मुद्दा माडांवा लागला.
एकदा मी एका बैठकी मधे होतो. तेथे नेहमी प्रमाणे सर्व जण ईग्रंजी मधून बोलत होते. तेथे एक मध्यमवर्गीय मध्यम वयीन स्त्री होती. तिला संभाषन समजन्यास अडचन होवू नये म्हणुन मी मराठीत बोलु लागलो, तर ती रागावुन मला म्हटंली कि, " कि मी मोलकरीण थोडीच आहे, मराठी त बोलायला.". मी वरमलो, आणि विचार करायला लागलो, असे का होत आहे? संताच्या, सैनिकाच्या, सर्वसाधारण लोकांच्या भाषेला इतकी उतरती कळा का लागावी? हे चित्र बदलेल का? कोन हे चित्र बदलवू शकेल?
परिस्थिती गंभीर आहे हे नक्की.