तुम्ही जर एखाद्या चांगल्या, वाचनीय, दर्जेदार अशा मराठी मासिकाच्या शोधात असाल तर अंतर्नाद हा एक चांगला पर्याय आहे. पण दुर्दैवाने अनेक लोकांना त्याविषयी माहितीच नाही असे वाटते त्यासाठी हा प्रस्ताव.
श्री. भानू काळे हे या मासिकाचे संपादक आहेत. अंकाचे वेगळेपण मलपृष्ठ
पाहिले तरी लगेच लक्षात येईल. उपदेश करण्याचा आव न आणता अंतर्मुख करणारा
संदेश दिलेला असतो. कथा, कविता, अनुवादित साहित्य,
विविध विषयांवरील
लेखमाला, पुस्तक परीक्षण असे सर्व प्रकारच्या साहित्याचा आस्वाद घेता
येतो. व्याकरण सल्लागार हे पद असणारे अंतर्नाद बहुतेक एकमेव प्रकाशन
असावे. जाहिराती जवळजवळ नाहीतच, आहेत त्याही साहित्यालाच वाहिलेल्या.
वार्षिक वर्गणी (दिवाळी अंकासहित) ३६० रूपये असून, परदेशातील अंकांसाठी
वर्षाला ५०० रूपये अधिक द्यावे लागतील. (म्हणजे, चलनविनिमयाच्या हिशोबात,
अमेरिकेत याची वर्गणी वर्षाला जेमतेम १९ डॉलर्स पडेल.)
फक्त वर्गणीचा धनादेश भारतीय चलनात पाठवावा लागेल. हे साधणे कठीण
असल्यास भारतातील आपल्या ओळखीची व्यक्ती हे काम आपल्यासाठी करू शकेल.
धनादेश वा ड्राफ्ट Antarnaad च्या नावे काढता येईल.
अंतर्नादचा पत्ता.
सी-२, गार्डन इस्टेट
वायरलेस कॉलनीजवळ
औंध
पुणे ४११००७
या पत्त्यावर पाठवता येईल.
(वरील माहिती अंतर्नाद आणि मराठी मासिके ह्या दुव्यावरून साभार.)