चित्तरंजन महाशय,

मी मुळात क्षमा मागण्यासारखे काही केलेले नाही त्यामुळे क्षमा मागायचा प्रश्नच उद्भवत नाही. आणि जर माझ्या हातून क्षमा मागण्यासारखे काही घडले तर न लाजता मी उघड व सर्वांसमक्ष क्षमा मागेन. जर प्रमाद खुले आम केला तर क्षमा मागायला व्य. नि. चा आसरा का? तीही जाहीर मागितली पाहिजे.

मुळात मी जे उद्गार दिले आहेत ते सत्य आहेत. पोपटपंची हा शब्दही निरर्थक बोल, तेच तेच बोलणे वा अर्थहीन आहे हे माहीत असूनही केलेले वाक्ताडन या अर्थाने समजूनच वापरलेला आहे. विचक्षण महाशयांनी विनाकारण प्रत्यक्ष संबंध व नेमकी घटना सोडून अवांतर विषय घुसडला आणि भलताच वाद सुरू केला. मनोगतच्या वाचकांना समज देणाऱ्या या महाशयांना आपल्या शेऱ्याचे परिणाम माहीत नव्हते अशी तर शक्यता दिसत नाही. असो. तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यांनी यापुढेही माझ्या लेखनावर जाहीर अभिप्राय द्यावेत, व्य. नि. नको. हे खुले व्यासपीठ आहे इथे जाहीर लेखन होते आणि जर प्रतिसाद व्यक्तिगत स्वरूपाच्या नसून लेखनाला असेल तर तो जाहीरच असला पाहिजे.