आणि जर माझ्या हातून क्षमा मागण्यासारखे काही घडले
तर न लाजता मी उघड व सर्वांसमक्ष क्षमा मागेन. जर प्रमाद खुले आम केला तर
क्षमा मागायला व्य. नि. चा आसरा का? तीही जाहीर मागितली पाहिजे.
आपले म्हणणे अगदी योग्य आहे.
मुळात मी जे उद्गार दिले आहेत ते सत्य आहेत.
वाद उद्गारांच्या सत्यासत्यतेबद्ल नाही.
पोपटपंची हा शब्दही निरर्थक बोल, तेच तेच बोलणे वा अर्थहीन आहे हे माहीत असूनही केलेले वाक्ताडन या अर्थाने समजूनच वापरलेला आहे.
वाक्ताडन चांगला शब्द आहे.:)
माझे मत एवढेच की राष्ट्रपुरुषांबत किंवा कुठल्याही मोठ्या माणसाबाबत सार्वजनिक मंचावर (जिथे वेगवेगळ्या विचारसरणी मानणारे किंवा झुगारणारे येतात, असतात) लिहिताना लेखकानेही (त्यात प्रतिसादीही आले) काही जबाबदाऱ्यांचे वहन करायला हवे. तुम्ही तुमच्या मताशी ठाम आहात ही उत्तम गोष्ट आहे. आपल्या एखाद्या वक्तव्याचा आसरा घेऊन काही लोक राष्ट्रपुरषांबद्दल काहीही बरळत सुटू शकतात, हेही लक्षात घ्यायला हवे. मग काय किल्ला लढवता लढवता मूळ लेख बाजूलाच राहतो.
बाकी काही नाही.
चित्तरंजन