माझे मत एवढेच की राष्ट्रपुरुषांबत किंवा कुठल्याही मोठ्या माणसाबाबत सार्वजनिक मंचावर (जिथे वेगवेगळ्या विचारसरणी मानणारे किंवा झुगारणारे येतात, असतात) लिहिताना लेखकानेही (त्यात प्रतिसादीही आले) काही जबाबदाऱ्यांचे वहन करायला हवे. तुम्ही तुमच्या मताशी ठाम आहात ही उत्तम गोष्ट आहे. आपल्या एखाद्या वक्तव्याचा आसरा घेऊन काही लोक राष्ट्रपुरषांबद्दल काहीही बरळत सुटू शकतात, हेही लक्षात घ्यायला हवे.  मग काय किल्ला लढवता लढवता मूळ लेख बाजूलाच राहतो.

चित्त महोदय - आपण मांडलेला विचार मनात डोकावून गेलाच. लिखाण प्रकाशित करण्यापूर्वी पुन्हा एकवार एखादा उणादुणा शब्द काढता येईल का हे पहायला हवे. सूत्र म्हणून शतशः मान्य!
(विषयांतर/खुलासा - येथे हे कदाचित लागू नाही हे मला कळते. साक्षींना (किंवा कोणालाही) आपली भावना/मतभेद ज्या तीव्रतेने व्यक्त करावेसे वाटतील तसे करावे... अन्यथा हा केवळ मने सांभाळण्याचा मंच होईल.)

पुरवणी - काही मंडळी काही ना काही खुसपट (अजाणता) किंवा कुरापत (जाणीवपूर्वक) नेहमीच काढणार आहेत. असा मतभेद व्यक्त करणे; तसेच त्यास उत्तरे देणे आवश्यक असते हे मान्य आहे. मात्र तरीही कोठे ही लांबड थांबवायची आणि लेखातील संकीर्ण संदेशाकडे वळायचे याचाही मी (आणि इतरांनीही) विचार करणे गरजेचे आहे.
अन्यथा उगाचच नसलेला किल्ला लढवता लढवता मूळ लेख बाजूलाच राहतो.