मी हे कन्सल्टींग करत असताना अनुभवलं आहे..
बऱ्याच वेळेला Resume ची छाननीकरणारे हे Non Technical असतात. त्यांना फक्त काही keywords माहित असतात. उ.दा. Visual Studio, Gmake, Perl
सॉफ्टवेअर क्षेत्रातील कोणीही सांगू शकेल की डेव्हलपमेंट करताना प्रोग्रॅमिंग लँग्वेज बरोबर इतर बऱ्याच गोष्टी लागतात जसं मेकफाईल्स, पर्ल स्क्रिप्टस, ई. ह्या गोष्टी गृहीत धरल्या जातात आणि त्या तितक्याशा अवघड पण नाहीत. पण हे Non technical लोकं ह्या गोष्टींसाठी हटून बसतात आणि यांच्या अज्ञानामुळे तुमचा बायोडेटा प्रत्यक्ष कंपनी पर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामूळे इछा आणि गरज नसून सुध्दा फक्त या दगडांना पार करण्यासाठी काही गोष्टी लिहाव्या लागतात. परंतू पूर्णपणे खोटी माहिती देणं किंवा खोटे कार्यानुभव देणं हे अत्यंत चुकीच आहे. पण हे घडतं काही consulting companies असे resume तयार करून देतात.
मला एकाने असेच काही मजेदार प्रश्न विचारले होते..
१. "तुम्ही युनिक्स मधे C++ programming करता पण तुम्हाला इमॅक्स किंवा व्ही आय येतं का? तुमच्या resume मधे तसं लिहिलं नाही आहे."
(उ. मनातलं)" नाही. मी हवेत प्रोग्रॅम लिहितो आणि वायरलेस ने पाठवतो."
२. तुम्ही लिनक्स मधे gcc compiler वापरलं आहे का?
(उ. मनातलं) नाही. मी स्वःताच object code तयार करतो आणि वायरलेस ने पाठवतो कारण मला इमॅक्स किंवा व्ही आय पण येत नाही ना!
आईशप्पथ! मला हे प्रश्ना विचारले गेले आहेत.
मनोगतः अहो, प्रतिसाद लिहिताना १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नका..
मीः काय करणार विषय तांत्रीक आहे ना म्हणून लिहिले. सोपं पडतं हो.
मनोगतः अहो, प्रतिसाद लिहिताना १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नका..
मीः अरे! अजून %वारी कमी झाली नाही वाटतं