लग्नानंतर पहिल्यांदाच व्यायाम करायला शिकले. सूर्यनमस्काराचा व्यायाम मला खूपच छान वाटला. माझे वजन वाढले (आधी खूपच कमी होते.). लवचिकतेसाठी सूर्यनमस्कार अतिशय सुंदर. नंतर जोर, बैठका सुरु केल्या. पण अगदी थोड्या प्रमाणात. जोर बैठका व्यायामात असे लक्षात आले की स्नायुंची ताकद वाढून एकाग्रता वाढते. चालणे पण दिवसातून १ दा तरी व्हायचे. पूर्वी हे सर्व रोजच्या रोज व नियमित होत असे. पण आजकाल व्यायाम रोजच्या रोज केला तर त्रास होतो. चालण्याच्या बाबतीत माझा थोडा वेगळा अनुभव आहे. जोरात चालण्याने अजिबात फायदा होत नाही. जितके हळू हळू चालते तिकके फायदेशीर ठरते. रोज चालणे झाले तर मान खूप दुखते. झोप लागत नाही. थोडी आसने पूर्वी करायचे पण आजकाल आसने केली तर थोडावेळ चांगले वाटते.

थोडक्यात हल्ली व्यायाम केला नाही  तर जास्त चांगले वाटते. पण म्हणून खूप दिवस केला नाही तर रोजची घरातली कामे पण जड वाटायला लागतात. सर्जरीनंतर व्यायामात अनियमितपणा येऊ शकतो की वय कारणीभूत असावे. कळत नाही.