विनायक, स्वानुभव वाटून दिल्याखातर धन्यवाद.
वॉर्म - अप, कूल-डाऊन वगैरे काही नाही. पुढे अंगातली लवचिकता गेली व कडकपणा आला. >>
वरील लेखातील माहितीच ह्यामुळे तथ्यांकित होत आहे.
सहा महिन्यात स्नायूंची कमावलेली शक्ती गेली, वजन १० किलोने घटले, मरणाचा अशक्तपणा आला.>>
हे अनाकलनीय वाटते. असंबद्ध वाटते. सखोल तपास करायला हवा.
मात्र आहार, विहार, व्यायाम, प्राणायाम ह्याबाबतीत भारतीय संस्कृतीत धरसोडीची वृत्ती क्षम्य नाही. सातत्य आणि कर्मठपणाचे गोडवे आपली सारी शास्त्रे गातात. आणि अनुभवांती मला तेच बरोबर वाटत आहे. अमेरिकन विचारसरणी मात्र सप्ताहात अमुक इतक्या कॅलरी खर्च व्हाव्यात असे मानते. अर्थातच सप्ताहांतर्गत सवलत दिली तरी ती विचारसरणीही त्यापश्चात सातत्याचाच पुरस्कार करते.
आज चालणे हा व्यायाम म्हटले तर उद्या श्वास घेणे पण व्यायाम होईल" >>
ज्याला आजारपणामुळे उभे राहता येत नसेल त्याला उभे राहणेही व्यायाम ठरेल. श्वास घेणे हा खरे तर व्यायाम होऊ नये, पण आपल्याला अवघडल्या जीवनशैलीपोटी केवळ १० टक्केच श्वसनशक्ती वापरता येण्यासारखी परिस्थिती निर्माण होते म्हणूनच प्राणायामाचे महत्त्व अधोरेखित करावे लागते.