रोहिणी, स्वानुभव वाटून दिल्याखातर धन्यवाद.

लवचिकतेसाठी सूर्यनमस्कार अतिशय सुंदर.  सत्यवचन.

आजकाल व्यायाम रोजच्या रोज केला तर त्रास होतो. जोरात चालण्याने अजिबात फायदा होत नाही. जितके हळू हळू चालते तितके फायदेशीर ठरते. रोज चालणे झाले तर मान खूप दुखते. झोप लागत नाही. ही लक्षणे, हे प्रतिसाद स्वस्थ, निरोगी शरीराचे वाटत नाहीत. विपरित वाटतात. दुखावलेल्या शरीराने केलेला व्यायाम वाईटाकडून वाईटाकडे केलेला प्रवास ठरू शकतो.

म्हणून रोगीपासून निरोगीपर्यंत, अस्वस्थतेपासून स्वस्थतेपर्यंत, स्वस्थतेकडून अधिक स्वस्थतेकडे असा प्रवास ह्याच क्रमाने होणे इष्ट. एखादीही पायरी उगाच गाळू नये.

थोडक्यात हल्ली व्यायाम केला नाही  तर जास्त चांगले वाटते. पण म्हणून खूप दिवस केला नाही तर रोजची घरातली कामे पण जड वाटायला लागतात. सर्जरीनंतर व्यायामात अनियमितपणा येऊ शकतो की वय कारणीभूत असावे. कळत नाही. आधी निरोगी, स्वस्थ होण्याची गरज दिसते. अस्वस्थता काय आहे ह्याचा तपास करायला हवा.