जीवनजिज्ञासा, दादला, भटका आणि वैद्य मी आपल्याशी सहमत आहे. मूळ प्रश्नांची माझी उत्तरे खालीलप्रमाणे.
सगळेच तंत्रज्ञान आवडते व त्यात सारखी गती असे शक्य आहे का? हो.
आपली आवड निवड याचे काही निकष त्यांना नसतात का? असतात.
असून मनाविरुद्ध ते असे करतात का? शक्य आहे.
असे असेल तर त्याची कारणे काय आहेत? दादला आणि भटका ह्यांनी दिलेल्या उत्तरांशी सहमत आहे.
स्थापत्यशास्त्र, उत्पादनतंत्र, रसायनशास्त्र यामधील कंपन्यात येणारे उमेदवार एवढ्या मोठ्या प्रमाणात खोटी माहिती भरतांना आढळले नाही. तुमचे काय मत आहे? असे का होते? काही प्रमाणात खोटी माहिती देण्याचे प्रमाण आढळतेच.
ह्याची कारणे पराकोटीची जीवघेणी स्पर्धा, भरमसाठ पगारांचे देकार, अतांत्रिक कर्मचाऱ्यांकडून गाळले जाऊ नये ही इच्छा; ही असावित.