त्याविरुद्ध कोणी "अविश्वास" दाखवू नये.
 रेडा वेदाची एखादी ऋचा विश्वास ठेवणे हे पूर्ण अयोग्य आहे.
        काय योग्य व काय अयोग्य हे तर भाषरावांनी ठरवून टाकले. पण मला जे कुतुहल होते ते मिलिंद आणि विश्वमोहिनी म्हणतात अविश्वासातूनच विज्ञानात मोठमोठे शोध लागतात त्याबद्दल. त्यावर जर प्रकाश टाकला असता तर बरे झाले असते. कारण माझ्या मते ज्या गोष्टीच्या शक्यतेवर दृढ विश्वास वाटत असेल त्यावरच प्रयत्नाची पराकाष्ठा होऊन संशोधन होऊं शकते आणि अशा संशोधनांतूनच विज्ञानातील शोध लागू शकतात. अविश्वासातून विज्ञानांतील शोध कसे लागू शकतील हे समजत नाही. 

        दुसरी interesting गोष्ट म्हणजे बऱ्याच वेळेला आपण दुसऱ्याला काय म्हणायचे आहे हे अनुमान (premise का hypothesis ?) करून त्यावरच आपण आपले वक्तव्य करतो. माझ्या दोन्ही प्रतिसादात मी "ह्यावर माझा विश्वास आहे" असे कुठेही म्हटलेले नाही. फक्त त्याच्या शक्यतेबद्दल विचार मांडत होतो. जोगळेकरांच्या उताऱ्याचा मी पुरस्कार करतो असे मिलिंदने बहुधा अनुमान केले असावे. पण माझा प्रतिसाद नीट वाचला असता तर जोगळेकरांच्या उताऱ्यावर त्यांनी "शेवटचे वाक्य उपहासाने लिहिले आहे असे दिसते" असेही म्हटले होते  हे लक्षात आले असते असो.  भाष रावांनीही बहुधा ' रेड्याने वेद म्हटले ' ह्यावर माझा विश्वास आहे असे ठरवून टाकले आणि तुम्हाला तरीही त्यावर विश्वास ठेवायचा असेल तर तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे असेही म्हणून टाकले. अर्थात् ते बरेच मोठे आहेत, त्यांनी जास्त पावसाळे पाहिलेत आणि जास्त देशाटन केले आहे, त्यांच्या अनुभवाचे गाठोडे मोठे आहे. त्यांना असे म्हणायचा अधिकार आहे हीच माझी भावना आहे.
        आता आपण मूळ मुद्द्याकडे वळू. चर्चेच्या विषयात म्हटले आहे ' यात कितपत तथ्य आहे. असे खरोखरच शक्य आहे का? ' आणि मला वाटत होते की त्याच अनुषंगाने माझी वाटचाल चाललेली होती. मी कसे शक्य आहे ह्यावर आपले म्हणणे मांडले एवढेच. चर्चेत सहभाग घेणाऱ्यांनी शोध घेणे अपेक्षित आहे असे मला वाटते. अजूनही मला " हे खरच शक्य आहे का " ह्याचा शोध घ्यावा असेच म्हणायचे आहे. पण त्या ऐवजी चर्चेला वेगळे वळण लागतेय असे दिसते आहे. खरेतर मला अजून  mass hypnotism चे तंत्र वापरण्याची एक शक्यता आहे ह्याबद्दल मला लिहायचे आहे. पण आता ह्या विषयावर आणखी काही मांडणेचे धाडस करणे कितपत योग्य होईल ह्याबद्दल साशंक आहे.
विरभि -