भारतात मुंबई आणि पुण्यात दोन्ही ठिकाणांच्या रिक्षाचालकांचा मला बऱ्यापैकी अनुभव आहे. तुलनात्मक दृष्ट्या मुंबईचे रिक्षाचालक जास्त प्रामाणिक आहेत.

पुण्यातही चांगले, प्रामाणिक रिक्षाचालक भेटले आहेत. जपानी रिक्षाचालकाप्रमाणे रस्ता चुकल्यास कमी मीटर घेणार नाहीत परंतु, रिक्षेला हात केल्यावर रिक्षेत एक शाळकरी मुलगी होती तिला जवळच्याच गल्लीत घरी सोडून नंतर पुन्हा, मी रिक्षा पकडली त्या ठीकाणी, आल्यानंतरच मीटर पाडून भाडेआकारणी करणारा रिक्षावालाही पुण्यातलाच.

६ वर्षापूर्वी घेतलेला गोदरेज फ्रीज आणि ५ वर्षापूर्वी मुलाला घेतलेली बजाज पल्सर उत्तम स्थितीच चालू आहे. हे अपवाद नाहीत. (कदाचित नियमही नसतील)

१ वर्षापूर्वी आणलेला डीव्हीडी प्लेअर (जपान) आणि मायक्रोव्हेव ओव्हन (जपान), वॉशिंग मशीन (इटली)  संरक्षक फ्यूज असूनही विजेच्या दाबाच्या अनियमिततेत धारातिर्थी कोसळले आहेत.

माझ्या वरील विधानातून सर्व जॅपनीज, युरोपिअन वस्तू टाकाऊ असतात असा अर्थ काढता येतो का? तर, उत्तर आहे, नाही.

आपल्याला सुधारण्याची अत्यंत निकडीची गरज आहे हे मान्य आहे तरीही, परिस्थिती अगदीच निराशाजनक नाही.