नमस्कार,

मी मनोगतावर खूप दिवसांपासनं आहे. आणि काही महिन्यांपासून ऑर्कुट अनुभवतोय. मनोगताला एवढे वर्ष चिटकलो आहे, याला अनेक कारणे आहेत आणि हो मनोगताने खूप सारे मित्र दिले आहेत. पुण्यात आल्यावर मनोगतावर असल्याने मजा आली.

ऑर्कुट बद्दल बोलायचे असल्यास तेथे सदस्यांचे पान असते ज्यात त्याचा खरा अथवा भावविश्वात ते स्वतःला जे काय समजतात त्याचा फोटो असतो. मात्र या पानावर त्याने दिलेली माहिती वाचून आपण त्याच्याशी मैत्री करू शकतो. ऑर्कुट वर अनेक मित्र भेटले काही जुने काही नवे आणि काही मनोगती.

मात्र मला येथे गटांचा सदस्य होऊन काही करता येईल असं वाटत नाही. कारण त्यांच्या गटांच्या नौकानयन पद्धतीत नवं काय घडलं याची माहिती नसते आणि एकाच प्रकारचे प्रतिसाद वाचत पान उघडणं कंटाळवाणं वाटतं. असो.

मी माझ्या गावाचा गट तयार केला. त्यामुळे माझे जुने मित्र मिळाले.

धन्यवाद मनोगत व ऑर्कुट !!!

नीलकांत