आपण देत असलेल्या साहित्या बरोबर काही संदर्भ, पूर्वपिठीका वा त्या रचनेचा रोख इत्यादीवर थोडी माहीती दिलीत तर आम्हाला त्याचा आस्वाद अधिक चांगल्या रितीने घेता येईल.

<<माझी भूमिका उपलब्ध करुन देणे यापुरतीच आहें. निरुपण करणारे तुम्ही कोण टिकोजीराव? हा दोष येऊ नये असे मला वाटते>>

तुम्ही जर चांगले कार्य करीत असाल तर कुणी दोष दिल्याने ते थांबवू नका. दोष द्यायला काय हो? एखादे चित्र काढायला प्रतिभा लागते, पण त्या चित्रातल्या व्यक्तीला दाढी-मीशा काढायला ती लागत नाही. जर तुम्हाला काही चांगले केल्याचे समाधान मिळत असेल तर कोण काय म्हणेल याची पर्वा का?