एका गोष्टीवर मला विश्वास आहे की सासू काहीही झालं तरी सुनेची खऱ्या अर्थाने आई होऊच शकत नाही.
हे वाक्य जेव्हा तुम्ही लिहीता त्याचवेळी सून त्या सासूची सख्खी मुलगी होऊ शकते का? असा दुसऱ्या बाजूचा विचार लिहीला नाही तर वाक्यात bias जाणवतो.
आजच्या काळात सख्खी मावशी तरी आई होऊ शकते का? मला वाटतं उत्तराची टक्केवारी सासू, सुनेची खऱ्या अर्थाने आई होऊ शकते का? या प्रश्नाच्या उत्तराएवढीच येईल.
उतारवयात मिळालेल्या readymade* मुलीशी सांभाळून घेणे तिच्याच्याने शक्य आहे का? (अर्थातच सुनेकडून या उलट परिस्थिती) हे लक्षात घेणे अत्यंत गरजेचे आहे. तेव्हा सासूला सासूच राहू द्याव. तो काय नकारात्मक शब्द किंवा नाते आहे का? तुम्हाला अभिप्रेत असणारी space यानेच साधली जाईल.
एखद्या बाबतीत सल्ला देण समजु शकतो पण बर्याचदा सल्ला आणि ढवळाढवळ यातिल फ़रक फ़ार पुसट असतो.
खरयं. सासू, सुनेत; आई-मुलीच नातं प्रस्थापित करण्याच्या हट्टापायी अतिपरिचयात अवज्ञा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
---
readymade - वयाने सज्ञान, शिकलेली, बहुतकरून आपल्या पायावर उभी आणि स्वतःची मते असलेली मुलगी.