रस्त्यावरुन अगर पद्पथावरुन चालण्याची एक पध्द्त असते. ती काटेकोरपणे पाळली गेली पाहिजे हे युरोपियन लोकांच्या रक्तात आहे. त्या गोष्टीच नक्कीच कौतुक केले पाहिजे. विषेशः जेव्हा भारताशी तुलना होते तेव्हा हि बाब विषेश करुन जाणवते.
सरकारी कचेरीत किंवा दुकानातही येणारा अनुभव भारताच्या तुलनेत खुप सुखद असतो. एक भारतीय म्हणुन मला (वैयक्तिक) हि बाब खुप शरमेची वाटते. भारतीय संस्कृती केवळ गप्पामधुन (अगर ई-गप्पामधुन) दिसुन येते असे माझे निरीक्षण आहे.
म्हणुनच पडलो तरी नाक वर चा तोरा सोडुन आपण प्रामाणिकपणे हे मान्य केले पाहिजे कि आपल्याला किमान रस्त्यानी चालण्याच तरी शिकल पाहिजे.