लाल-बाल-पाल तसेच योगी अरविंद (ऑरोबिंदो) या स्वातंत्र्यसमरातील अध्वर्युंचा एनसीईआरटी च्या संशोधकांनी अतिरेकी (की दहशतवादी?) असा उल्लेख इतिहासाच्या नविन पुस्तकांत केल्याचे ई-सकाळ मध्ये वाचले. संसदेमध्येही याचे प्रतिसाद उमटले म्हणे... ते संसदेतले जाऊ द्या ... पण या नेत्यांविषयी इतका द्वेष का? की कोण्या विशिष्ट नेत्यांनाच मोठे दाखवण्याच्या प्रयत्नात हेतुपुरस्सर या लोकनेत्यांची निर्भर्त्सना केली जाते?
या नेत्यांचे मोठेपण/ योगदान मान्य केले म्हणजे इतर नेत्यांचे मोठेपण कमी होईल असे नाही .. पण तरीही काही लोक असे करतात .... किती हा द्वेष?... चिंताजनक आहे..!
...लोकमान्यांच्या १५० व्या जयंतीचे वर्ष आहे... हे येथे उल्लेखनीय!