नविन कायद्यापेक्षा आहे तेच व्यवस्थित राबवणाऱ्या/राबवुन घेणाऱ्या समाजाची भारताला अधिक गरज आहे असे मला वाटते. भारतात किती लोक सरकारी कर नियमितपणे भरतात? मला वाटते फ़ारच कमी लोक असावेत. विजेची चोरी, पाण्याची चोरी, सरकारी जागेवर अतिक्रमण, शेतसारा चुकवण्याच्या नाना खटपटी..... माहितीचा अधिकाराचा वापर करण्याचे नैतिक बळ अशा समाजात कुठून येणार ना !
आपल्याला गरज आहे ती सुजाण समाजाची, आणि हिच आपली समस्या आहे.
अर्थातच अण्णा हजारेंचे जाहीर आभार मानलेच पाहिजे, त्यांच कार्य व समाजसेवेच मुल्य करता येणे शक्य नाही.