माझ्या माहितीप्रमाणे या गोष्टीचा शेवट थोडा वेगळा आहे. तो खालीलप्रमाणे-
आपल्याला पाहून स्त्रिया संकोचल्या हे पाहून व्यासांनी स्त्रियांना विचारले, "माझा मुलगा तरूण असूनही तो बाजूने जात असतांना तुम्हास काही वाटले नाही. मग पित्यासमान असलेल्या मला पाहून तुम्ही का संकोचलात?" त्यावर स्त्रियांनी उत्तर दिले, "शुकमुनि वाऱ्या पावसासारखे वाटले. आपण मात्र पुरुष आहांत असे वाटल्यामुळे आम्हाला संकोच वाटला." स्त्रियांचे हे उत्तर शुकमुनींच्या कानांवर पडले. त्यांच्या मनांत आले, "आपल्या मानाने आपले वडील अध्यात्मांत अजूनही खूप मागे आहेत". आपल्या मुलाच्या मनांत आलेला अहंकारी विचार व्यासांना (अंतर्ज्ञानाने) समजला. ते त्याला उद्देशून म्हणाले, "जा, जा. तुला अजून तपश्चर्येची गरज आहे" आणि ते शुकमुनींचा पाठलाग सोडून देऊन मागे फिरले.