१. माझा जन्म हिंदू म्हणून झाला, त्यामुळे 'माझ्या' गोष्टींबाबत जी मला 'मम'ता वाटते, ती हिंदू धर्माबाबत वाटणे साहजिक आहे.

नंदनचं म्हणणं खरं आहे, मला पटतं. मी जन्मापासूनच हिंदू आहे त्यामुळे प्रेम अधिक वाटत असावे. (मला वाटत हिंदू धर्माव्यतिरिक्त शिंटो धर्म जन्मापासून माणसामागे लागतो. चू. भू. दे. घे.) बाकी बऱ्याच धर्मांची दीक्षा घ्यावी लागते.

हिंदू धर्मात आता तितकिशी कर्मठ विचारसरणी न राहिल्याने मला तो 'सोयिस्कर' वाटतो. याचे कारण आपला धर्म प्राचीन असल्याने झालेले फेरफार असावेत. इतर धर्मात कालांतराने तसे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हिंदु तत्त्वज्ञान अधिक सकस व सकारात्मक आहे.

हे मलाही मान्य. किंवा देवाशी खुला संवाद साधायला हिंदू धर्मात प्रेषित नावाचे माध्यम (medium) लागत नाही हे ही खरे.

बंदा हा बंदाच राहतो, त्याचा कधी खुदा होत नाही.

हे मला तितकेसे वाईट वाटत नाही. दर १० दिवसांनी ईश्वराचा अवतार, देवाचे रुप घेण्यापेक्षा परवडले.

एकंदरीत धर्म ही अफूची गोळी आहे (किंवा कंपूबाजीचे उत्तम उदाहरण आहे), हा विचार मला पटतो.