हिंदू धर्माला नावे ठेवा, थट्टा करा पण शेवटी स्वतःला जन्माने हिंदूच समजा! मग चांगल्या वाटणाऱ्या धर्मामधे धर्मांतर का करून घेत नाहीत? किंवा "मी धर्मच मानत नाही" असे का म्हणत नाही? किंवा त्याहूनही अधिक म्हणजे, आपण कुठल्याही इतर धर्मावर (योग्य) टिका करून पहा त्या धर्मात राहता तरी येइल असे वाटते का? उदाहरणच द्येयचे झाले तर, हमिद दलवाईंनी महाराष्ट्रात मुस्लीम सत्यशोधक समाज चालू केल्यावर त्यांना नुसत्या मारण्याच्या धमक्याच आल्या नाहीत तर त्यांना मुसलमान कबरस्तानात दफ़न करण्यासाठी जागाही नाकारण्यात आली...अशी अनेक उदाहरणे सांगता येतील.
एक गोष्ट नक्की हिंदूं धर्मात कालानुरूप वाईट प्रथा आल्या पण त्यांचा आणि अनुसरून असलेल्या अंधश्रध्दांचा त्रास हा हिंदू धर्मियांनाच झाला आहे आणि त्यांनी त्यात बदल करण्यासाठी टिका करणे योग्यही आहे. पण काठावर बसून नुसती टिका करू नका.. काही तरी काम करायला लागा आणि मग नैतिक बळ तयार झाल्यावर बोला. त्यावरील उच्च उदाहरणे म्हणजे स्वामी विवेकानंद अथवा वीर सावरकर. कदाचित इथल्या वाचकांमधे न आवडणारे आणिक एक उदाहरण देतो, ते म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितिय सरसंघचालक गोळवळकर गुरूजींचेः
हिंदू धर्मातील सर्व पंथांना एक करण्यासाठी त्यांनी विश्व हिंदू परीषदेची कल्पना अस्तित्त्वात आणली. त्या काळी (१९६० च्या दशकात) त्यांनी सर्व धर्ममार्तंडांना नुसते एका व्यासपिठावरच आणले नाही तर त्यांच्याकडून ठराव संमत करून घेतला की 'हिंदू धर्मातील जातीव्यवस्था अनुचित असून आम्ही आता ती पाळणार नाही"..! हे पुराव्यानिशी आहे. अर्थात प्रसार माध्यामांच्या अतिव प्रेमामुळे ही घटना बोलण्यापेक्षा त्यांच्याबद्द्ल काय किंवा सावरकरांबद्द्ल काय, "गांधी हत्ये"बद्द्लच बोलले जाते, न्यायालयाने त्यांना निर्दोष ठरवले तरीही...
शिवाय मला सांगा की हिंदूनी आपणहून कुठल्या परधर्मियांना त्रास दिला आहे? स्वदेशात अथावा परदेशात? आता काही जणांचे आचार विचार पटोत अथवा न पटोत, पण अगदी हिंदूनी ज्या काही परधर्मियांविरूद्ध गोष्टी केल्यात त्या प्रतिक्रियात्मक होत्या. स्वतः चालू करून नव्हत्या.
नाम्या....
I think I have understood Hinduism correctly when I say that it is eternal, all embracing and flexible enough to suit all situations.
महात्मा गांधी