नामदेव पंत,
आपला प्रतिसाद सुनिलरावांना असल्याने बाकी आपल चालू दे. एक/ दोन खटकलेले मुद्दे असेः
हिंदूनी आपणहून कुठल्या परधर्मियांना त्रास दिला आहे?
याची काही गरज होती का? स्वधर्मीयांना छळण्यात हजारो वर्षे घालवली तेवढे पुरेसे नाही काय? तेवढे केल्यावर परधर्मीयांना छळण्याचे फारसे त्राण उरले नसावे.
काही तरी काम करायला लागा आणि मग नैतिक बळ तयार झाल्यावर बोला.
त्याची काही गरज नसते. माणसाने स्वतःपासून सुरुवात करावी तेवढच खूप असत. समाजसेवेचा डंका पिटायची गरज नसते.
असो.
धर्म ही भरल्या पोटी चघळायची गोळी आहे. भुकेल्या पोटाला फक्त वासना असते.