वरील चर्चा आणि आलेले प्रतिसाद पाहता एकूणच हिंदू धर्माची महती म्हणजे 'दगडा पेक्षा विट मऊ' इतकिच वाटते!
जाता जाता - 'हिंदू' धर्म म्हणजे नक्की काय? ख्रिस्ती किंवा इस्लाम धर्मात ही व्याख्या सोपी आहे. बायबल आणि कुराण ह्या ग्रंथांमध्ये अनुक्रमे ख्रिश्चन आणि मुसलमान असण्यासाठी काय करावे लागते ह्याची मार्गदर्शक तत्वे दिली आहेत. त्यामुळे त्यांच्या धर्माच्या व्याख्या ह्या सोप्या आहेत. 'बायबल मानणारा तो ख्रिश्चन', 'कुराण पाळणारा तो मुस्लिम' इत्यादी.. पण हिंदू धर्माची व्याख्या काय? एखादी व्यक्ती हिंदु धर्माचे पालन करते का नाही हे कसे ठरवायचे? जाणकारांनी प्रकाश टाकावा...