"...धर्म ही भरल्या पोटी चघळायची गोळी आहे. भुकेल्या पोटाला फक्त वासना असते."

याचा अर्थ पॅलेस्टाईन मधील अथवा इतर ठिकाणी असलेली धर्मांध आत्मघातकी पथके धर्म भरल्या पोटी चघळत असतात तर!

"..त्याची काही गरज नसते. माणसाने स्वतःपासून सुरुवात करावी तेवढच खूप असत. समाजसेवेचा डंका पिटायची गरज नसते..."

समाजसेवेचा डंका पिटायचा नसतो पण यथाशक्ती करायची असते. शिवाय स्वतःचे घर साफ़ करण्यात जशी समाजसेवा नसते तसेच ज्या काही आपण "आपल्या" गोष्टी मानतो, कळत न कळत उपभोगतो, त्या चांगल्या करण्यासाठी, सुधारण्यासाठी (यथाशक्ती) झगडणे हे योग्य आहे - त्यात आपण  कुणाची सेवा करत नसतो तर स्वतःचा स्वार्थच साधत असतो...

हिंदू धर्मापेक्षा हिंदू समाजात वाईट गोष्टी, सवयी आहेत. आपण सर्वच थोड्याफार फरकाने त्याचा भाग आहोत आणि जबाबदार आहोत. त्यामुळे आपण स्वतः आचरण करून फरक आणणे महत्वाचे, नावे ठेवणे आणि काठावर बसून पोहायला सांगणे नेहेमीच सोपे असते..(याबाबतीत आपले एकमत आहे असे वाट्ते!). असो, हे समजण्यासाठी खालील सर्व असमान्य व्यक्ती असलेल्या प्रसंगाचे उदाहरण पहाः

१९व्या शतकाच्या शेवटाला न्यायमुर्ती रानड्यांबद्द्ल सर्वत्र अतिव आदर होता आणि तसे त्यांचे व्यक्तिमत्व होतेही. त्यांनी हिंदु धर्म सुधारण्यासाठी आणि खूप प्रयत्न केले, टिकाही केली.  विधवाविवाहाला संमती मिळाण्यासाठी स्त्रीयांना स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कार्य केले - जननिंदा सहन करून. याच रानड्यांनी  पत्नीचे देहावसान झाल्यावर वडीलांनी हट्ट धरल्याबद्द्ल वयातही न आलेल्या मुलीशी विवाह केला...अंधश्रद्धेच्या विरुद्ध होते. पण जेंव्हा (आनंदी बाईंच्या) गोपाळराव जोश्यांनी "पाद्रयाच्या" हातून चहा पाजून त्यांना गावातून बहिष्कृत होयला लावले, तेंव्हा याच रानड्यांनी पापक्षालनार्थ माफी मागीतली. वेळ आली तेंव्हा आचरणशून्य...

याउलट महर्षी धोंडो केशव कर्वे ह्यांनी विधवाविवाहासाठी कायदा होण्यासाठी प्रयत्नही केला आणि स्वतःदेखील विधवेशीच विवाह केला. त्या विवाहसमारंभाला ते टिळकांना बोलावयाला गेले. तेंव्हा टिळक (या अर्थी) म्हणाले की "माझ्या आत्त्ताच्या स्वातंत्र्य आंदोलनासाठी मला लोकांची गरज आसल्यामुळे मी अशा समारंभात भाग घेवू शकणार नाही, पण तुम्ही करत असलेली गोष्ट योग्यही आहे आणि हिंदू समाज हळूहळू बदलण्याची गरजही आहे. तेंव्हा तुम्हाला माझे आशिर्वाद आणि मदत राहील.." विचार - आचार यात प्रामाणिकपणा..

आपण स्वतःच्या आयुष्यात हिंदू धर्मातील कुठल्या वाईट चाली रिति सोडल्या याबद्द्ल सर्वांनी चर्चा केल्यास बरे होईल!