स्वतःचे घर साफ़ करण्यात जशी समाजसेवा नसते
का बुवा? माझे साफ घर पाहून इतरांना आपले घर साफ ठेवण्याची इच्छा झाली तर ती गोष्ट चांगली नाही का? प्रत्येक माणसाने सुरुवात आपल्या घरापासूनच करावी.
आपण स्वतः आचरण करून फरक आणणे महत्वाचे
सहमत. स्वतः आचरण म्हणजेच स्वतःचे घर साफ करून नं?
याचा अर्थ पॅलेस्टाईन मधील अथवा इतर ठिकाणी असलेली धर्मांध आत्मघातकी पथके धर्म भरल्या पोटी चघळत असतात तर!
धन्य वाटले वाचून. दहशतवादाला धर्म म्हणायचे का? ठिक आहे. आपल्या प्रश्नाचे उत्तर "हो!" हिजबुल्लाच्या एकंदर लष्करी कवायती, त्यांच्याकडे असणारा १०००० वर क्षेपणास्त्रांचा साठा, त्यांना पैशाची मदत पुरवणारी अरब राष्ट्रांतील धेंडे पाहता हो, पैशांशिवाय असली थेरं करता येत नाहीत असे म्हणेन.
लहान मुलांच्या हातात प्लास्टिकच्या चाव्या देऊन त्यांना "ही स्वर्गाचे दार उघडण्याची किल्ली आहे" हे सांगताना त्या चाव्या पुरवायला ही पैसे लागतात. आणि लंडन - न्यू यॉर्क विमान प्रवासात बॉम्ब ठेवण्यासाठीही पैशांची मोठ्या प्रमाणावर उलाढाल केली जाते.
बाबरी मशिदी समोर फटके खाणाराही सामान्य गरीब हिंदू असतो आणि पॅलेस्टाईन मधे नको त्या वयात शस्त्र उचलणारा सामान्य गरीब मुसलमान असतो. अर्थात, त्यांना धर्माचा हवाला देणारे, त्यांचे बोलविते धनी जे सुरक्षित असतात ते पैशांनी गब्बरच असतात.
असो. एकंदरीतच या बाबतीत आपल दुमत दिसतय तेव्हा अधिक खोलात गेल्यास विषयांतर होते आहे.
आपण स्वतःच्या आयुष्यात हिंदू धर्मातील कुठल्या वाईट चाली रिति सोडल्या याबद्द्ल सर्वांनी चर्चा केल्यास बरे होईल!
१००% सहमत. विषयावर चर्चा करायला मलाही आवडेल.