आठवणी आवडल्या. रांगोळीचे रंग अतिशय सुरेख ! जुने म्हणजे २-३ वर्षांपूर्वीचे दिवस डोळ्यासमोर उभे राहिले.

पहिली रांगोळी हातभर झाडूने झाडताना आईलाच चुकचुकल्यासारखं वाटायचं. पण त्या रांगोळीवरून अर्धगोलाकार झाडू फिरवल्यावर तयार होणारे इंद्रधनुष्यी आकार आणि रंग पाहायला मजा यायची. सगळे रंग एकत्रित होऊन एक वेगळाच रंग तयार व्हायचा. नंतर नंतर आम्ही तोही रंग बाटलीत भरून ठेवून कधीमधी वापरायला लागलो.

अगदी तंतोतंत. कधीकधी रांगोळी पुसणे इतके जीववर यायचे की मग पहिलीच्या शेजारी दुसरी अशी आगगाडी लावली जायची. आणि शेवटची रांगोळी तर दिवाळीनंतरचे २-३ दिवस जपली जायची.

रांगोळीच्या चार कोपऱ्यात किंवा मध्यभागी पणती ठेवून त्यावर फुलबाजी पेटवून त्या फुलांचा सडा चमचमणाऱ्या रांगोळीवर पडताना त्या रांगोळीचे उठावदार रंग पहायला मजा यायची. बाकीच्या फटाक्यांपेक्षा अशा फुलबाज्या उडवणे मला जास्त आवडायचे.