(शाळेत असताना फळ्यावर लिहायला बरेचदा आम्ही मुले हे सुविचार योग्य समजत असू. कारण फळ्यावर 'सुविचार' लिहिणे आणि 'समाजसेवा' नामक विषयाच्या तासासाठी दर आठवड्याला त्या विषयाच्या वहीत 'आपण मागच्या आठवडाभरात केलेली सत्कृत्ये' लिहिणे - आणि त्यावर शिक्षिकेकडून सही घेणे! - हे आमच्या शालेय जीवनातले दोन परमोच्च उच्छाद होते. बऱ्याचदा आमची - म्हणजे माझीच नव्हे, आम्हा सगळ्यांचीच - 'सत्कृत्यांची यादी' ही 'एका म्हातारीला रस्ता क्रॉस करायला मदत केली' [!], 'वर्गातला एक विभाग स्वच्छ केला', 'शाळेच्या अंगणाच्या एका भागातले तण उपटले', 'गृहपाठ वेळच्यावेळी केला', 'डबा खाताना सांडला नाही', 'सर्व सत्कृत्ये खरी लिहिली' [!!] अशा छापाच्या [म्हणजे थोडक्यात एक तर unverifiable and unrefutable irrefutable किंवा utterly trivial] 'सत्कृत्यां'नी भरलेली असे. करणार काय? सत्कृत्ये लिहिणे तर अनिवार्य (mandatory / compulsory अशा अर्थाने) होते, आणि दर आठवड्याला आम्ही तरी नवनवी सत्कृत्ये कुठून लिहिणार? [आणि for that matter रोज नवनवीन सुविचार तरी कुठून आणणार?]
तसेही त्या [म्हणजे 'समाजसेवे'च्या] तासाला प्रत्यक्षात संपूर्ण 'समाजसेवक' [म्हणजे त्या वेळी 'समाजसेवे'चा तास चालू असलेल्या] वर्गाने मिळून शाळेसमोरच्या अंगणातले गवत उपटणे यापलीकडे काहीही होत नसे!)