मला असे वाटते की हिंदू धर्म ही एक जीवन पद्धती आहे. जी अत्यंत सहिष्णू असल्यामुळे हजारो वर्षांनंतरही टिकून आहे आणि राहीलही. जगात नवीन धर्म उदयास आले त्यांचा प्रचार प्रसारही झाला. पण इतका जूना धर्म त्यांच्यासमक्ष याच मुळे टिकून राहीला की त्यात अमकी गोष्ट ही केलीच पाहिजे असे बंधन कोणत्याही काळात नव्हते. आसपासच्या निसर्गातील गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हीच पूजा होती. पण त्यातही सक्ती नव्हती. काळानुसार होणारे बदल या धर्माने आपल्यात सामावून घेतल्यामुळे मला आपला धर्म आवडतो.