हा हा हा
काल देवी दूध पित होती... बहुधा सर्व देवांचा प्रसादप्राशनाचा दिवस ठरला असेल. :)

देव नाही असे म्हणणाऱ्यांसाठी खास मी हे लिखाणाचे काम हाती घेत आहे.
अरे हो, तुम्ही हे लेखन आम्हा लोकांसाठी केलेय ना...
मग मला शरद कोर्डेंचे प्रश्न पुन्हा विचारावेसे वाटतात. आणि काही...
अहो तुमचा संगणक गणपतीच्या आकाराचा आहे का? मध्ये गणपतीच्या आकाराच्या CD  निघाल्या होत्या, तसेच काही तरी. नाहीतर मग तो उंदीर गणपतीला सोडून कुठे फिरत होता?
मग तुम्ही पुन्हा एकदा घरातील खऱ्या उंदरांना दूध/कॉफी पाजण्याचा प्रयत्न केलात का? निदान त्या संगणकाच्या उंदराला तरी... आणि ते प्यायले का?

तुम्ही काहीही म्हणा, पण मला पूर्ण विश्वास आहे की साक्षात श्री गणेशाची माझ्यावर कृपा झाली आहे म्हणूनच हे घडलं.
तुमची श्रद्धा/भक्ती आहे ना, त्याला माझे काहीही म्हणणे नाही.

आणि माझा तुमच्याशी काही वैयक्तिक आक्षेप/वाद नाही. मी फक्त ह्या लेखाला प्रतिक्रिया लिहित आहे. :)