तुमची रांगोळी खूपच सुंदर आहे. खूपच आवडली. मला पण आमच्या दोघींच्या(मी व माझी बहीण) रांगोळीची आठवण झाली. आता ती मजा गेली. खरच तुम्ही म्हणता त्याप्रमाणे रांगोळींचे फोटो काढून ठेवायला हवे होते म्हणजे आठवणी कायम स्वरूपी राहिल्या असत्या.
रांगोळी ही एक सुंदर कला आहे. रांगोळीचे नाजुक व बारीक ठिपके, रंग भरताना पण एकसारखा भरता यायला हवा, दोन ठिपक्यांमधील रेष पण एकदम बारीक यायला हवी. रंगाची रंगसंगती जुळायला हवी.
लहानपणी काढलेल्या सर्व रांगोळ्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. त्यामध्ये भरलेले रंग दिसले. तुमच्या रांगोळीने आठवणींना उजाळा मिळाला. अनेक धन्यवाद.